Monday, September 27, 2010

हॅपी बर्थडे टू गुगल

आघाडीच्या गुगल सर्च इंजीनने नुकताच आपला बारावा वाढदिवस साजरा केला. अर्थात, गुगलच्या वाढदिवसाच्या तारखेबद्दल संभ्रम असला तरी चार सप्टेंबर रोजी गुगलची कंपनी म्हणून नोंद झाली. 15 सप्टेंबर 1998 रोजी गुगलने www.google.com या डोमेनची नोंदणी केली. त्यानंतर मात्र गुगलकडून 27 सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरा केला जातो.

गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सेजी ब्रीन हे सर्वप्रथम 1995 मध्ये भेटले. 1996 मध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात एक प्रोजेक्ट सुरू केला. या प्रोजेक्टचं रूपांतर गुगल नावाच्या कंपनीमध्ये झाले.

गुगलच्या या वाढदिवसानिमित्त गुगलने अमेरिकेसह अन्य देशांतील होमपेजवर नवा लोगो तयार केला होता. एका केकवर गुगल असं लिहिलेला लोगो अमेरिकेतील वेन दीबेव्ड या 89 वर्षीय चित्रकाराने तयार केला आहे.


गुगलच्या बाराव्या वाढदिवसानिमित्त तयार केलेला लोगो...


गुगलने होम पेजवर केलेले अन्य लोगो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


गुगलविषयी काही महत्त्वाचं

  • गुगल या शब्दाचा गणिती अर्थ एक(1)वर शंभर शून्य असा होतो.

  • गुगल सर्चच्या होमपेजवर दिसणारे ”I feel lucky”हा पर्याय युजरकडून सर्वात कमी वेळा वापरला जातो. तरीही गुगल हा पर्याय काढून टाकण्याचा विचार करत नाही. कारण त्यांना सर्च लूक आणि फिलमध्ये बदल करायचा नाही.

  • गुगलची ई-मेल सेवा असलेल्या जी-मेलचा वापर तब्बल दोन वर्षे गुगल कार्यालयात केला जात होता. त्यानंतर गुगलने एक एप्रिल 2004 रोजी तो सर्वासाठी खुल केला.

  • क्रेग सिल्वरस्टीन हा गुगलचा पहिला कर्मचारी होय.

  • लॅरी पेज आणि सेजी ब्रीन यांनी गुगलची सुरुवात ज्या ठिकाणी सर्वप्रथम केली. ते ठिकाण पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Saturday, September 25, 2010

`बॉम सबाडो' नष्ट करण्यात गुगलला यश

ऑर्कुट या आघाडीच्या सोशल नेटवर्किंग साइटवर हल्ला करणारा बॉम सबाडो नामक बग काढून टाकण्यात गुगलला यश आले आहे. गुगलने आपल्या अधिकृत ब्लॉगवर यासंदर्भात माहिती दिली आहे. यामुळे जगभरातील लाखो युजर्स वारत असलेले ऑर्कुट आत्ता सुरक्षित झाले आहे. शनिवारी बॉम सबाडोया बगने ऑर्कुटवर हल्ला केला होता. यामुळे जगभरातील अनेक युजर्सचे अकाउंट हॅक झाले होते. मात्र गुगलने तातडीने यावर उपाय शोधून काढला.

या बगचा फटका बसलेली ऑर्कुट प्रोफाइल्स पुन्हा सुरू करण्यासाठीही गुगलचे प्रयत्न चालू आहे. या बगने ऑर्कुटवर हल्ला केल्यानंतर नेट युजर्सनी त्याचा चांगलाच धसका घेतला होता. या काळात युजर्सना सावध करणा-यांचे गुगलने आभार मानले आहेत.

Friday, September 24, 2010

इंटरनेट एक्स्प्लोरर 9 बिटा

माक्रोसॉफ्टने इंटरनेट एक्सप्लोरर 9चे बिटा व्हर्जन नुकतेच लाँच केले आहे. जगभरातील नेट युझरकडून आयईचा सर्वाधिक वापर होत असला तरी गेल्या काही दिवसांमध्ये गुगल क्रोम आणि मोझीलाफायरफॉक्सच्या बरोबरीने आयईला स्पर्धा करावी लागत आहे. माक्रोसॉफ्टने आयई 9 बिटामध्ये अनेक नव्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच याचे Graphics आणि designया आधीच्या व्हर्जनपेक्षा अधिक चांगले आहे.

आयई 9 बिटा ला नेट युझरकडून जोरदार प्रतिसाद मिळाला असून पहिल्या ४८ तासांत वीस लाख युझर्सनी हे व्हर्जन डाऊनलोड करून घेतलं आहे.

आयई 9 बिटा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.



ऑर्कुटवर ‘बॉम सबाडो’ बगचा हल्ला

ऑर्कुट या आघाडीच्या सोशल नेटवर्किंग साइटवरबॉम सबाडोनामकबगने हल्ला केला असून स्क्रॅपच्या माध्यमातून येणारा हा बग ऑर्कुटचे खाते हॅक करू शकतो.बॉम सबाडोया मूळ पोर्तुगिज शब्दाचा अर्थ गुड सॅटर्डेअसा असला तरी या बॉम सबाडोने अनेक ऑर्कुट युजर्सचा शनिवार खराब केला आहे.


या बगचा नेट युझर्सनी चांगलाच धसका घेतला असून गुगल ट्रेन्डसनुसार अवघ्या काही तासांत मोस्ट पॉप्युलर सर्चमध्ये बॉन सबाडो 13व्या क्रमांकावर पोहचला आहे. ऑर्कुटवरबॉम सबाडोचा हल्ला होण्याची या आठवड्यातील दुसरी वेळ आहे. ऑर्कुटसोबतच फेसबुक या आणखी एका सोशल नेटवर्किंग साइटवर या बगने हल्ला केल्याचे समजते. ऑर्कुटवरस्क्रॅपच्या माध्यमातून तर फेसबुकवरवॉलच्या माध्यमातून या बगने हल्ला केल्याचे वृत्त आहे.

एक्सएसएस’ (क्रॉस-साइट स्क्रिप्टिंग) प्रकारच्या या बगमुळे ऑर्कुट युजरचे अकांउट हॅक होण्याचा धोका आहे. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत ऑर्कुटचा वापर न करु नये असे, ऑर्कुटने म्हटले आहे. तसेच कोणत्याही संशयास्पद लिंकला क्लिक करु नये, असेही ऑर्कुटने कळवले आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून ऑर्कुट फिसर्च अपडेट करत आहे. त्यानंतर दुस-यांदा अशा प्रकारच्या बगने ऑर्कुटवर हल्ला केला आहे. या आठवड्यात टि्वटरवरहीबॉम सबाडोने हल्ला केला होता. शनिवारपासून ऑर्कुट युजर्सच्या खात्यावर मित्रांकडून आपोआपबॉम सबाडोचास्क्रॅपयेत आहे. यावर क्लिक केल्यास खाते तर हॅक होतेच. शिवाय नव्या कम्युनिटीज आपोआप जॉइन होतात. तसेच बाउझरही हॅक होण्याचा धोका आहे. अशा प्रकारच्या स्क्रॅपला क्लिक केले असेल तर युजरने ऑर्कुटच्या जुन्या व्हर्जनवर जाऊन साइन आऊट करावे. कम्युनिटीमध्ये काही नव्या कम्युनिटी आल्या असतील तर त्या अनजॉइन कराव्यात. तसेच वापरत असलेल्या ब्राऊझरमधीलकैशआणिकुकीज्डिलिट कराव्यात. त्यानंतर पुन्हा ऑर्कुटला लॉगइन करुन पासवर्ड आणि सुरक्षाविषयक प्रश्नाचे उत्तर बदलावा. तसेच ऑर्कुट ओपन करताना अन्य वेबसाइटच्या माध्यमातून ओपन न करता www.orkut.com वरुन ओपन करा.

या संदर्भात गुगले अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Thursday, September 23, 2010

मराठी ब्लॉगरसाठी स्पर्धा

इंटरनेटवर स्वत:ला व्यक्त करणारं ब्लॉग हे प्रभावी माध्यम होत चाललं आहे. यातही मराठी ब्लॉगची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. मराठी ब्लॉगर्सना प्रोत्साहन देण्यासाठीस्टार माझाच्या वतीनेब्लॉग माझाही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचं हे तिसरं वर्ष असून मराठी ब्लॉगर्ससाठी अशी ही एकमेव स्पर्धा आहे.

या स्पर्धेसाठी स्वत:चा ब्लॉग पाठवण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2010 आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ब्लॉगर्सनी आपलं नाव, ब्लॉगची लिंक आदी माहिती blogmajha3@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावी, असं आवाहनस्टार माझाच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Sunday, September 19, 2010

प्रबोधनकार तुमच्यापर्यंत!

आपल्याला हवा असणारा संदर्भ शोधण्यासाठी इंटरनेटचा वापर केला जातो. मात्र इंटरनेटवर मिळणारी माहिती ही प्रसिद्ध आणि सर्वज्ञात असते. त्यातही मराठीतून एखादा संदर्भ मिळणं अधिकच कठीण. कारण यासाठी आवश्यक वेबसाइट मराठीतून तयार झालेल्या नाहीत. मात्र आता महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय क्षेत्रात ठसा उमटवणा-या व्यक्तीची माहिती इंटरनेटवर मराठीतून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. नुकतीच थोर समाजसुधारक आणि क्रांतिकारक विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनचरित्रावरीलं www.prabodhankar.com ही वेबसाइट नुकतीच लाँच करण्यात आली आहे.



या वेबसाइटवर प्रबोधनकारांनी लिहिलेली पुस्तकं आणि अप्रकाशित लेख ठेवण्यात आले आहेत. हे लेख पीडीएफ स्वरूपात असून ते डाऊनलोड करण्याची सोय देण्यात आली आहे. प्रबोधनकारांवर लिहिलेली पुस्तकं, पीएचडीचे प्रबंध, प्रासंगिक लेख आणि त्यांच्याविषयी अन्य ठिकाणी लिहून आलेले लेख या ठिकाणी एकत्रितपणे देण्यात आले आहेत. तसेच प्रबोधनकारांचे फोटो, व्हिडिओ, वॉलपेपर देण्यात आले आहेत.

या वेबसाइटचं स्वरूप युझर फ्रेंडली ठेवण्यात आलं आहे. मात्र त्यात एक त्रुटी जाणवते. प्रबोधनकारांच्या संदर्भात एखादा संदर्भ शोधण्यासाठी त्या ठिकाणी सर्चचा पर्याय नाही. मराठी अथवा इंग्रजीमध्ये सर्चचा तो पर्याय उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. या साइटच्या माध्यमातून प्रबोधनकारांच्या साहित्यावर आणि विचारांवर ऑनलाइन चर्चसत्रंही आयोजित करता येतील. इंटरनेटवरील सोशल नेटवर्किंग साइटचा प्रभाव पाहता या साइटने ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर अशा सोशल नेटवर्किंग साइटशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. या माध्यमातून साइटची माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होऊ शकेल.

या साइटची संकल्पना पत्रकार सचिन परब यांची असून हा प्रयोग केवळ एका साइटपुरता मर्यादित नाही तर महाराष्ट्रातील अन्य कर्तृत्ववान व्यक्तीचे अशा प्रकारे इंटरनेटच्या माध्यमातून डॉक्युमेंटेशन करण्याची परब यांची योजना आहे. मराठी भाषेचा इंटरनेटवरील टक्का वाढवण्यासाठी केलेली ही कल्पना निश्चितच अभिनंदनीय आहे.



Friday, September 17, 2010

ट्विटर नव्या स्वरूपात...

मायक्रोब्लॉगिंगमधील आघाडीच्या ट्विटरमध्ये लवकरच नवे बदल होणार असल्याचं ट्विटरने जाहीर केलं आहे. या बदलामुळे ट्विटरच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडिओ पाहता येणं शक्य होणार आहे. तसेच ट्विटरच्या पेजमध्ये बदल होणार असून सध्या मेसेज पाठवण्याच्या बाजूला दुसरी विंडो असेल. ज्यात फोटो, व्हिडिओ आणि अन्य माहिती असेल. ट्विटरच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी तसंच ते शेअर करण्यासाठी यूट्यूब, फ्लिकर, जस्टइन.टीव्ही, ट्विटगो, ट्विट पिक, ट्विटव्हिड, युस्ट्रीम, व्हिमिओ आणि वायफ्रॉग या वेबसाइट्सबरोबर करार करण्यात आले आहेत.


टि्वटच्या संदर्भातील अन्य लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


Tuesday, September 14, 2010

गुगलद्वारे लवकरच म्युझिक सेवा..


इंटरनेटवरून आपल्याला हवं असलेलं म्युझिक किंवा गाणी डाऊनलोड करणे तसेच ते शेअरिंग करण्याची सेवा यात सध्या अ‍ॅपल आघाडीवर आहे. गुगल आपल्या म्युझिक सेवेच्या माध्यमातून थेट अ‍ॅपलला टक्कर देणार आहे. काही दिवसांपूर्वी अ‍ॅपलने पिंगच्या माध्यमातून सोशलनेटवर्किंगमध्ये प्रवेश केला होता.

सर्च इंजिनमध्ये आघाडीवर असलेले गुगल येत्या डिसेंबरमध्ये आपली म्युझिक सेवा सुरू करणार आहे. ही सेवा ख्रिसमसच्या मुहूर्तावर सुरू होण्याची शक्यता आहे. इंटरनेटवरून आपल्याला हवं असलेलं म्युझिक किंवा गाणी डाऊनलोड करणे तसेच ते शेअरिंग करण्याची सेवा यात सध्या अ‍ॅपल आघाडीवर आहे. गुगल आपल्या म्युझिक सेवेच्या माध्यमातून थेट अ‍ॅपलला टक्कर देणार आहे. काही दिवसांपूर्वी अ‍ॅपलनेपिंगच्या माध्यमातून सोशलनेटवर्किंगमध्ये प्रवेश केला होता. इंटरनेटवर म्युझिक क्षेत्राची वाढत जाणारी क्रेझ आणि त्याची बाजारपेठ या दृष्टीने सर्व आघाडीच्या कंपन्यांनी पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे.

अ‍ॅपलने 2003 मध्ये म्युझिक डाऊनलोड सेवेच्या विक्रीची सुरुवात केली होती. त्यानंतर आतापर्यंत अ‍ॅपलची यामध्ये मक्तेदारी राहिली आहे. अमेरिकेतील ऑनलाइन म्युझिक विक्रीमध्ये अ‍ॅपलचा वाटा 80 टक्के इतका आहे. मात्र यूट्यूब आणि सर्च इंजिनच्या माध्यमातून गुगलला यामध्ये मोठी संधी आहे. गुगलद्वारे सुरू करण्यात येणा-या या सेवेमुळे अ‍ॅपलची ही मक्तेदारी टिकेल का, याचं उत्तर मिळण्यासाठी डिसेंबपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Sunday, September 12, 2010

अ‍ॅप्लिकेशन्स एका क्लिकवर

संगणकाची अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करायची म्हणजे खूप वेळकाढू काम असतं. आणि प्रत्येक अ‍ॅप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर एकाच ठिकाणी मिळत नाही. त्याची शोधाशोधही करावी लागते. अशा वेळी एका क्लिकमधून ही अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करता आली तर किती बरं होईल. अशा काही वेबसाइट्स आहेत ज्यांच्यावरून तुम्ही अ‍ॅप्लिकेशन्स डाउनलोड करून घेऊ शकता.

नवा संगणक घेतला की त्यामध्ये अनेक महत्त्वाची अ‍ॅप्लिकेशन आवश्यक असतात. उदा- Google chrom, firefox, antivirus programs, firewall, Google Talk, Skype, FileZilla, Adobe Reader, Flash plugin, Open office, Silverlight, Adobe AIR आदी. मात्र हे किंवा अन्य अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचे असतील तर प्रत्येक अ‍ॅप्लिकेशन स्वतंत्रपणे डाऊनलोड करून घ्यावं लागतं. कधी कधी संगणक अथवा लॅपटॉप format करताना आधी असलेली सगळी अ‍ॅप्लिकेशन्स पुन्हा डाऊनलोड करावी लागतात. मात्र ही सर्व अ‍ॅप्लिकेशन एका क्लिकवर डाऊनलोड करता आली तर वेळही वाचेलच त्याचबरोबर अ‍ॅप्लिकेशनची शोधाशोधही करावी लागणार नाही.

तुमच्या नव्या संगणकासाठी लागणारी सर्व आवश्यक अ‍ॅप्लिकेशन्स http://allmyapps.com या

वेबसाइटवर एकत्रितपणे देण्यात आली आहेत. आणि ही अ‍ॅप्लिकेसन्स एकाच वेळी डाऊनलोडही करता येतात. या वेबसाइवर अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी एक

registration देण्यात आला आहे. त्याद्वारे तुम्ही अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करू शकता. मात्र यासाठी या साइटवर registration रावं लागतं. अर्थात, ते मोफत आहे.

यातही तुमची सोय बघितली गेली आहे. प्रत्येक संगणकाची ऑपरेटिंग सिस्टीम वेगळी असते. कोणतंही अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करताना सिस्टीम बघणं महत्त्वाचं असतं. या वेबसाइटवरून अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करताना तुमच्या संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम कोणती आहे त्यानुसार ही अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करू शकता. या साइटवर Graphics, Video, Audio, Science,Games, System, educati

on Accessibility, web, Communication, Security, Utilities, office, Imaging, File sharing, Development

अशी विभागानुसार अ‍ॅप्लिकेशनची यादी देण्यात आली आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही वी ती अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करू शकता.


अगदी नवीन संगणकातही तुम्हाला हवी असलेली अ‍ॅप्लिकेशन्स तुम्ही या साइटवरून डाऊनलोड करू शकतात.

वरील साइटप्रमाणेच http://ninite.com हीदेखील अशाच स्वरूपाची साइट आहे. फरक इतकाच की, या साइटवर तुम्हाला साइन-अप अथवा registration करावं लागत नाही. मात्र यावर केवळ विंडोजमध्येच चालणारी अ‍ॅप्लिकेशन्स दिली आहेत.




  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP