`बॉम सबाडो' नष्ट करण्यात गुगलला यश
ऑर्कुट या आघाडीच्या सोशल नेटवर्किंग साइटवर हल्ला करणारा ‘बॉम सबाडो’ नामक बग काढून टाकण्यात गुगलला यश आले आहे. गुगलने आपल्या अधिकृत ब्लॉगवर यासंदर्भात माहिती दिली आहे. यामुळे जगभरातील लाखो युजर्स वारत असलेले ऑर्कुट आत्ता सुरक्षित झाले आहे. शनिवारी ‘बॉम सबाडो’या ‘बग’ने ऑर्कुटवर हल्ला केला होता. यामुळे जगभरातील अनेक युजर्सचे अकाउंट हॅक झाले होते. मात्र गुगलने तातडीने यावर उपाय शोधून काढला.
या बगचा फटका बसलेली ऑर्कुट प्रोफाइल्स पुन्हा सुरू करण्यासाठीही गुगलचे प्रयत्न चालू आहे. या बगने ऑर्कुटवर हल्ला केल्यानंतर नेट युजर्सनी त्याचा चांगलाच धसका घेतला होता. या काळात युजर्सना सावध करणा-यांचे गुगलने आभार मानले आहेत.
0 comments:
Post a Comment