गुगलद्वारे लवकरच म्युझिक सेवा..
इंटरनेटवरून आपल्याला हवं असलेलं म्युझिक किंवा गाणी डाऊनलोड करणे तसेच ते शेअरिंग करण्याची सेवा यात सध्या अॅपल आघाडीवर आहे. गुगल आपल्या म्युझिक सेवेच्या माध्यमातून थेट अॅपलला टक्कर देणार आहे. काही दिवसांपूर्वी अॅपलने ‘पिंग’च्या माध्यमातून सोशलनेटवर्किंगमध्ये प्रवेश केला होता.
सर्च इंजिनमध्ये आघाडीवर असलेले गुगल येत्या डिसेंबरमध्ये आपली म्युझिक सेवा सुरू करणार आहे. ही सेवा ख्रिसमसच्या मुहूर्तावर सुरू होण्याची शक्यता आहे. इंटरनेटवरून आपल्याला हवं असलेलं म्युझिक किंवा गाणी डाऊनलोड करणे तसेच ते शेअरिंग करण्याची सेवा यात सध्या अॅपल आघाडीवर आहे. गुगल आपल्या म्युझिक सेवेच्या माध्यमातून थेट अॅपलला टक्कर देणार आहे. काही दिवसांपूर्वी अॅपलने ‘पिंग’च्या माध्यमातून सोशलनेटवर्किंगमध्ये प्रवेश केला होता. इंटरनेटवर म्युझिक क्षेत्राची वाढत जाणारी क्रेझ आणि त्याची बाजारपेठ या दृष्टीने सर्व आघाडीच्या कंपन्यांनी पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे.
अॅपलने 2003 मध्ये म्युझिक डाऊनलोड सेवेच्या विक्रीची सुरुवात केली होती. त्यानंतर आतापर्यंत अॅपलची यामध्ये मक्तेदारी राहिली आहे. अमेरिकेतील ऑनलाइन म्युझिक विक्रीमध्ये अॅपलचा वाटा 80 टक्के इतका आहे. मात्र यूट्यूब आणि सर्च इंजिनच्या माध्यमातून गुगलला यामध्ये मोठी संधी आहे. गुगलद्वारे सुरू करण्यात येणा-या या सेवेमुळे अॅपलची ही मक्तेदारी टिकेल का, याचं उत्तर मिळण्यासाठी डिसेंबपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
0 comments:
Post a Comment