Monday, September 27, 2010

हॅपी बर्थडे टू गुगल

आघाडीच्या गुगल सर्च इंजीनने नुकताच आपला बारावा वाढदिवस साजरा केला. अर्थात, गुगलच्या वाढदिवसाच्या तारखेबद्दल संभ्रम असला तरी चार सप्टेंबर रोजी गुगलची कंपनी म्हणून नोंद झाली. 15 सप्टेंबर 1998 रोजी गुगलने www.google.com या डोमेनची नोंदणी केली. त्यानंतर मात्र गुगलकडून 27 सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरा केला जातो.

गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सेजी ब्रीन हे सर्वप्रथम 1995 मध्ये भेटले. 1996 मध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात एक प्रोजेक्ट सुरू केला. या प्रोजेक्टचं रूपांतर गुगल नावाच्या कंपनीमध्ये झाले.

गुगलच्या या वाढदिवसानिमित्त गुगलने अमेरिकेसह अन्य देशांतील होमपेजवर नवा लोगो तयार केला होता. एका केकवर गुगल असं लिहिलेला लोगो अमेरिकेतील वेन दीबेव्ड या 89 वर्षीय चित्रकाराने तयार केला आहे.


गुगलच्या बाराव्या वाढदिवसानिमित्त तयार केलेला लोगो...


गुगलने होम पेजवर केलेले अन्य लोगो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


गुगलविषयी काही महत्त्वाचं

  • गुगल या शब्दाचा गणिती अर्थ एक(1)वर शंभर शून्य असा होतो.

  • गुगल सर्चच्या होमपेजवर दिसणारे ”I feel lucky”हा पर्याय युजरकडून सर्वात कमी वेळा वापरला जातो. तरीही गुगल हा पर्याय काढून टाकण्याचा विचार करत नाही. कारण त्यांना सर्च लूक आणि फिलमध्ये बदल करायचा नाही.

  • गुगलची ई-मेल सेवा असलेल्या जी-मेलचा वापर तब्बल दोन वर्षे गुगल कार्यालयात केला जात होता. त्यानंतर गुगलने एक एप्रिल 2004 रोजी तो सर्वासाठी खुल केला.

  • क्रेग सिल्वरस्टीन हा गुगलचा पहिला कर्मचारी होय.

  • लॅरी पेज आणि सेजी ब्रीन यांनी गुगलची सुरुवात ज्या ठिकाणी सर्वप्रथम केली. ते ठिकाण पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

0 comments:

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP