संगणकाची अॅप्लिकेशन डाऊनलोड करायची म्हणजे खूप वेळकाढू काम असतं. आणि प्रत्येक अॅप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर एकाच ठिकाणी मिळत नाही. त्याची शोधाशोधही करावी लागते. अशा वेळी एका क्लिकमधून ही अॅप्लिकेशन डाऊनलोड करता आली तर किती बरं होईल. अशा काही वेबसाइट्स आहेत ज्यांच्यावरून तुम्ही अॅप्लिकेशन्स डाउनलोड करून घेऊ शकता.
नवा संगणक घेतला की त्यामध्ये अनेक महत्त्वाची अॅप्लिकेशन आवश्यक असतात. उदा- Google chrom, firefox, antivirus programs, firewall, Google Talk, Skype, FileZilla, Adobe Reader, Flash plugin, Open office, Silverlight, Adobe AIR आदी. मात्र हे किंवा अन्य अॅप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचे असतील तर प्रत्येक अॅप्लिकेशन स्वतंत्रपणे डाऊनलोड करून घ्यावं लागतं. कधी कधी संगणक अथवा लॅपटॉप format करताना आधी असलेली सगळी अॅप्लिकेशन्स पुन्हा डाऊनलोड करावी लागतात. मात्र ही सर्व अॅप्लिकेशन एका क्लिकवर डाऊनलोड करता आली तर वेळही वाचेलच त्याचबरोबर अॅप्लिकेशनची शोधाशोधही करावी लागणार नाही.
तुमच्या नव्या संगणकासाठी लागणारी सर्व आवश्यक अॅप्लिकेशन्स http://allmyapps.com या
वेबसाइटवर एकत्रितपणे देण्यात आली आहेत. आणि ही अॅप्लिकेसन्स एकाच वेळी डाऊनलोडही करता येतात. या वेबसाइटवर अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी एक
registration देण्यात आला आहे. त्याद्वारे तुम्ही अॅप्लिकेशन डाऊनलोड करू शकता. मात्र यासाठी या साइटवर registration करावं लागतं. अर्थात, ते मोफत आहे.
यातही तुमची सोय बघितली गेली आहे. प्रत्येक संगणकाची ऑपरेटिंग सिस्टीम वेगळी असते. कोणतंही अॅप्लिकेशन डाऊनलोड करताना सिस्टीम बघणं महत्त्वाचं असतं. या वेबसाइटवरून अॅप्लिकेशन डाऊनलोड करताना तुमच्या संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम कोणती आहे त्यानुसार ही अॅप्लिकेशन डाऊनलोड करू शकता. या साइटवर Graphics, Video, Audio, Science,Games, System, educati
on Accessibility, web, Communication, Security, Utilities, office, Imaging, File sharing, Development
अशी विभागानुसार अॅप्लिकेशनची यादी देण्यात आली आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही हवी ती अॅप्लिकेशन डाऊनलोड करू शकता.
अगदी नवीन संगणकातही तुम्हाला हवी असलेली अॅप्लिकेशन्स तुम्ही या साइटवरून डाऊनलोड करू शकतात.
वरील साइटप्रमाणेच http://ninite.com हीदेखील अशाच स्वरूपाची साइट आहे. फरक इतकाच की, या साइटवर तुम्हाला साइन-अप अथवा registration करावं लागत नाही. मात्र यावर केवळ विंडोजमध्येच चालणारी अॅप्लिकेशन्स दिली आहेत.
1 comments:
amazing...
Rohan
Post a Comment