Monday, September 6, 2010

इनकमिंग ई-मेलचं वर्गीकरण अधिकच सोप्पं


आजकाल आपल्याला येणा-या अनावश्यक ई मेल्सचं प्रमाण वाढीस लागलंय. हे पाहता गुगलने जी-मेलमध्ये येणा-या ई-मेलच्या वर्गीकरणासाठी प्रायॉरिटी इनबॉक्स ही नवीन यंत्रणा विकसीत केली आहे. जी-मेलच्या प्रायॉरिटी इनबॉक्स या सुरक्षा यंत्रणेमुळे अनावश्यक ई-मेल्सना आळा तर बसतोच. शिवाय वेळच्या वेळी ई-मेल्स वाचण्याचीही सवय लागते.

गुगलने जी-मेलमध्ये येणा-या ई-मेलच्या वर्गीकरणासाठी प्रायॉरिटी इनबॉक्स नावाची नवीन यंत्रणा विकसित केली आहे. आपल्या इनबॉक्समध्ये अनेक वेळा अनावश्यक मेल येतात. अशा ई-मेलचा त्रास होऊ नये म्हणून जी-मेलकडे spam filtering ही सर्वोत्तम अशी सोय आहे. मात्र spam शिवाय असे बरेच मेल असतात की, जे इतके आपल्या कामाशी संबंधित नसतात. अशा मेलमुळे अनेक वेळा महत्त्वाचा मेल वाचायचा राहून जातो किंवा वेळच्या वेळेवर महत्त्वाचे मेल वाचण्याचं राहून जातं. यामुळे अनेक वेळा महत्त्वाची कामं राहून जातात अथवा आपल्याला वेळेत निरोप मिळत नाही. गुगलने यावर उपाय सुचवला आहे तो प्रायॉरिटी इनबॉक्सचा.






जी-मेलच्या या प्रायॉरिटी इनबॉक्समुळे तुम्ही तुमच्या सर्व इनकमिंग ई-मेलचं Important and unread, Starred आणि Everything else प्रकारात वर्गीकरण करू शकता. या शिवाय तुम्ही जी-मेलमधील कोणताही एखादा विभाग प्रायॉरिटीमध्ये समाविष्ट करू शकता.





जी-मेल ओपन करताच उजव्या बाजूच्या वरच्या कोप-यात New Priority Inbox हा पर्याय दिसेल. यावर क्लिक करून तुम्ही हा पर्याय वापरू शकता. जी-मेलने प्रायॉरिटी इनबॉक्सचा वापर कसा करावा यासंदर्भातील एक व्हिडिओ दिला आहे. प्रायॉरिटी इनबॉक्स पर्याय ऑन केल्यानंतर तुमच्या जी-मेलच्या इनबॉक्सचे Important and unread, Starred आणि Everything else यामध्ये विभागणी होते. जी-मेलच्या Settings मधील प्रायॉरिटी इनबॉक्समध्ये जाऊन तुम्ही यामध्ये आवश्यक ते बदल करू शकता. या तिन्ही विभागांमध्ये किती ई-मेल दिसले पाहिजेत यासंदर्भातील बदल तुम्ही Settings मधून करू शकता.








  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP