Tuesday, September 7, 2010

पिंगची झिंग अन् सोशल नेटवर्किंग

सोशल नेटवर्किंगचे हेच माध्यम आता आणखी उपयुक्त बनत चालले आहे. केवळ संवादापुरते मर्यादित न राहता आता त्याने माहिती-तंत्रज्ञान यांच्या देवाण-घेवाणीचे दालन नेटिझन्सना उपलब्ध करून दिले आहे. याचीच प्रचिती गेल्या आठवड्यात घडलेल्या दोन घटनांनी दिली आहे.

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासून तो समूहात राहात आला आहे. आपापसात संवाद साधण्यासाठी त्याने सुरुवातीला हातवा-यांचा आणि चिन्हांचा वापर केला. नंतर भाषेचा जन्म झाला आणि माणसामाणसांतील संवाद अधिक स्पष्ट आणि प्रभावी होत गेला. टेलिफोन, मोबाइल आणि इंटरनेटच्या शोधाने या संवादाला अंतराच्या मर्यादेतून मुक्त केले. इंटरनेटवरून होणा-या संवादाला सर्वात व्यापक व्यासपीठ मिळवून दिले आहे सोशल नेटवर्किंगने. मात्र एकमेकांशी संपर्क-संवाद-संभाषण साधण्याचे माध्यम बनलेले सोशल नेटवर्किंगआता केवळ गप्पाटप्पा करणे किंवा ओळखीपाळखीपुरते उरलेले नाही, तर त्यामागील खरा अर्थ समाजसंपर्कआता उमगू लागला आहे. मुंबई पोलिसांनी सुरू केलेली फेसबुकवरील कम्युनिटी असो वा काही दिवसांपूर्वी रिक्षा-टॅक्सीचालकांच्या मनमानीविरोधात छेडण्यात आलेली मीटर जॅमही मोहीम असो, ‘सोशल नेटवर्किंगने समाजात होणा-या चळवळींना व्यापक, वेगवान आणि तितकेच सुलभ व स्वस्त माध्यम उपलब्ध करून दिले आहे.

सोशल नेटवर्किंगचे हेच माध्यम आता आणखी उपयुक्त बनत चालले आहे. केवळ संवादापुरते मर्यादित न राहता आता त्याने माहिती-तंत्रज्ञान यांच्या देवाण-घेवाणीचे दालन नेटिझन्सना उपलब्ध करून दिले आहे. याचीच प्रचिती गेल्या आठवड्यात घडलेल्या दोन घटनांनी दिली आहे. एक म्हणजे गुगलने मोबाइल आणि स्मार्टफोनसाठी गेम्स तयार करणा-या सोशल डेस्कने ही वेबसाइट विकत घेतली आणि आयपॅड, आयफोन उत्पादन क्षेत्रातील आघाडीच्या अ‍ॅपलनेपिंगया अ‍ॅप्लिकेशनद्वारे सोशल नेटवर्किंग क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.



सोशलडेस्क मोबाइल आणि सोशल नेटवर्किं ग वेबसाइटसाठी गेम्स तयार करते. याआधी सोशलडेस्कने फेसबुक, अ‍ॅपलचा आयफोन आणि ब्लॅकबरीसाठी तयार केलेले गेम्स प्रसिद्ध आहेत. गुगलने ही कंपनी किती डॉलरमध्ये विकत घेतली, हे अद्याप जाहीर झाले नसले तरी सोशल नेटवर्किंगमध्ये गुगल आपले स्थान बळकट करण्यासाठी ही वेबसाइट विकत घेतल्याची चर्चा आहे.

अ‍ॅपल पिंगचे नेहमीच्या सोशल नेटवर्किंगप्रमाणे नसून ते आयट्यून्सवर आधारित अ‍ॅप्लिकेशन आहे. याद्वारे यूझर आपले आवडते संगीत ऐकू शकतील, त्याचबरोबर आपले मित्र कोणते संगीत ऐकत आहेत,याचे अपडेट मिळवू शकतील.‘पिंद्वारे जगभरातील म्युझिक बँड्स नव्या गाण्याचे अपडेट, त्याचे रिव्ह्यू कळणार आहेत. या बँड्सचे कार्यक्रम कोठे होणार आहेत, याची माहिती पिंगच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच आपल्याला आवडणारे संगीतही ते ऑनलाइन विकत घेण्याची सोय यामध्ये देण्यात आली आहे. पिंगच्या माध्यमातून युझर आपल्या आवडत्या संगीतकारांना आणि ग्रुपला फॉलो करू शकतात. अ‍ॅपलकडून याचे वर्णन Facebook meets Twitter for music असे करण्यात आले आहे. सध्या ऑर्कुटमधील कम्युनिटीज किंवा फेसबुकमधील ग्रुप याप्रमाणेच पिंगचे स्वरूप असून यामध्ये प्रामुख्याने संगीत आणि त्याच्याशी आधारित अन्य उपक्रमांना स्थान देण्यात आले आहे.

अ‍ॅपलशिवाय अन्य पॅनडॉरा आणि झुएन सोशियल या माक्रोसॉफ्टने म्युझिक शेरिंग अ‍ॅप्लिकेशन आहेत,मात्र यामध्ये अ‍ॅपलला मोठी संधी आहे. कारण अ‍ॅपलच्या आयट्यून्सचे जगभरातील 23 देशांमधून 160 दशलक्ष युझर्स आहेत.

अ‍ॅपलच्या पिंगला पहिल्या दोन दिवसांत जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून, सुमारे दहा लाख युझर्स पिंगचे सदस्य झाले आहेत. पिंगमुळे फेसबुक आणि अ‍ॅपलमधील स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. सोशल नेटवर्किंगमध्ये फेसबुकने प्रवेश केल्यानंतर मायस्पेसच्या युजरची संख्या कमी झाली. आता पिंगमुळे फेसबुकला हीच भीती वाटत असावी. यामुळेच अन्य नेटवर्किंगद्वारे माहिती शेअर करण्यावर बंदी घालणा-या फेसबुकने अ‍ॅपलच्या पिंगची ही सेवा ब्लॉक केली आहे. याआधी फेसबुकने ट्विटरवरून माहिती शेअर करण्यावर बंदी घातली होती. फेसबुकवरील युजरची माहिती मिळवण्यासाठी त्याच्या application programming interfaces ने मान्यता द्यावी लागते. सध्या फेसबुककडे अशा अनेक कंपन्यांकडून माहिती मिळवण्यासाठी परवानगी मागितली जाते. मात्र अ‍ॅपलला अशी परवाणगी दिली जाईल का, याबद्दल शंका आहेत. अ‍ॅपल आणि फेसबुकमध्ये या संदर्भात चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे.

अ‍ॅपलच्या आयट्यून्सचा वापर करणारे सर्व जण पिंगचा वापर करतील, हे आताच सांगता येणे शक्य नसले तरी पिंगमुळे सोशल नेटवर्किंग वेबसाइटमध्ये सध्याच्या स्वरूपामध्ये बदल होणार आहेत. हे बदल फेसबुक, ऑर्कुट, मायस्पेस आणि ट्विटरच्या माध्यमातून पाहायला मिळतील. सोशल नेटवर्किंगच्या बाजारपेठेत सध्याच्या घडीला अ‍ॅपल ही एकमेव कंपनी आहे, जी फेसबुकला टक्कर देऊ शकते. त्यामुळे भविष्यात या दोन्हींमधील स्पर्धा आणखी वाढणार आहे. याशिवाय गुगलही आपल्या ऑर्कुटच्या माध्यमातून या स्पर्धेत आहेच.

गेल्या आठवड्यात बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतातील इंटरनेट वापरणा-यांची संख्या 2015 पर्यंत 24 कोटींवर पोहोचणार आहे. तर ब्राझील, रशिया, चीन, इंडोनेशिया या देशांमधील इंटरनेट वापरणा-यांची संख्या 61 कोटी होईल. कॉम स्कोअर या कंपनीच्या अहवालानुसार जुलै महिन्यात भारतात फेसबुकने ऑर्कुटला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. या अहवालांतून इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंगच्या वाढत्या वापराची कल्पना येते. जगभरात एकाच वेळी उपलब्ध होऊ शकणारे हे एकमेव माध्यम असल्याने स्वत:चे वर्चस्व राखण्यासाठी या वेबसाइट बनवणा-या कंपन्यांमधील व्यावसायिक स्पर्धाही तीव्र होत चालली आहे. मात्र या स्पर्धेमुळे यूजर्सचाच फायदा अधिक होत आहे. त्यामुळे ही स्पर्धा अशीच कायम राहिली, तर भविष्यात सोशल नेटवर्किंग हे शिक्षण, आरोग्य आणि प्रशासन यांच्यासाठीही प्रभावी माध्यम ठरण्यास हरकत नाही.


0 comments:

  © Blogger template 'A Click Apart' by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP